पिंपरी / चिंचवड

शिक्षण जास्त अन मुली झाल्या म्हणून विवाहितेचा छळ

पिंपरी l प्रतिनिधी

शिक्षण जास्त असल्याच्या तसेच मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 एप्रिल 2016 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कराड, जि. सातारा येथे घडला.

कल्पेश धीरजलाल शहा (वय 44), कोकिला धीरजलाल शहा (वय 75), योगेश धीरजलाल शहा (वय 46), प्रेरणा शहा (वय 43), कुमुदिनी कोठारी (वय 48) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेची शिक्षण जास्त आहे, तसेच फिर्यादीला मुली झाल्या या कारणावरून टोमणे मारून वाद करून शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादीला बघून घेण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीला आणि त्यांच्या मुलींच्या खर्चासाठी पैसे न देता त्यांना सासरी नांदवण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी माहेरी आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button