breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टपासून सुरू होणार

मुंबई ; कोरोना साथीच्या काळात शैक्षणिक कॅलेंडर विस्कळीत झाले होते. त्यामुळे विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी पदवी पूर्व अभ्यासक्रमाचे वर्ग वेळेत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यूजीसी कडून विद्यापीठांना त्यांचे शैक्षणिक कॅलेंडर लवकर प्रसिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे

महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याबाबतचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांना दिले आहेत. त्यामुळे सर्व विद्यापीठांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालय सुरू करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

हेही वाचा – ‘शरद पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय केला’; चंद्रशेखर बावनकुळे

यामुळे संस्थांचे व संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक उपक्रम वेळेत पार पाडता येतील. शैक्षणिक सत्र पुन्हा रुळावर आणण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून यूजीसीने मागील पदवी वर्गांचे निकाल जूनच्या अखेरीस जाहीर करण्याच्या सूचना देखील विद्यापीठांना दिल्या आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी यूजीसीने सर्व विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना दिली होती. व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील प्रकल्पाचे काम आणि इंटर्नशीप आदी बाबी लक्षात घेऊन आयोगाने आणखी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. पदवी सह पदव्युत्तर वर्ग सुरू करा, असेही यूजीसी कडून सुचित करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button