breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा देशात तिसऱ्या स्थानी

पिंपरी |महाईन्यूज|

स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये लोणावळा नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. मागील तीन वर्ष लोणावळा नगरपरिषदेने या स्पर्धेत सहभाग घेत सलग तिन्ही वेळेस राष्ट्रीय नामांकन मिळविले आहे. 20 ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्घतीने या पुरस्काराचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3898 आणि 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. लोणावळा शहराची आजमितीला लोकसंख्या 57 हजार 698 असून, बाहेरून फिरायला येणाऱ्या पर्यटकांची दैनंदिन सरासरी संख्या 13 हजार 321 इतकी आहे. अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेने तिसरा क्रमांक मिळविला. यापूर्वी 2018 साली लोणावळा नगरपरिषद सातव्या व 2019 साली दुसऱ्या क्रमांकावर होती.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने 163 कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, संस्थांमधील पुरुष, महिला व मुले मिळून 18 हजार 302 जणांनी सहभाग नोंदविला होता. शौचालय सुविधेच्या बाबतीन 2019 साली लोणावळा नगरपरिषदेला ओडीएफ+ व 2020 साली ओडीएफ++ दर्जा मिळाला आहे. शहरात 40 सार्वजनिक शौचायले असून यापैकी 10 शौचालयांना स्टार दर्जा प्राप्त आहे. या व्यतिरिक्‍त 524 शौचालयांसाठी अनुदान देण्यात आले होते.

यावर्षी लोणावळा शहराला देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी तसेच पर्यटकांनी मी लोणावळेकर म्हणून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नवनियुक्‍त मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button