breaking-newsराष्ट्रिय

वर्ग स्वच्छ करताना विद्यार्थ्याला डसला विंचू, शाळेने डॉक्टरऐवजी मांत्रिकाकडे नेल्याने मृत्यू

सरकारी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका चौथीतल्या विद्यार्थ्याला वर्ग स्वच्छ करीत असताना विंचवाने दंश केला. त्यावर तातडीने डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्याऐवजी शाळा प्रशासनाने मांत्रिकाकडे नेल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील एका गावात ही घटना घडली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, झाशीमधील एका गावातील सरकारी प्राथमिक शाळेत बुधवारी हा प्रकार घडला आहे. चौथीत शिकणाऱ्या १० वर्षीय मुलाला शाळेच्या मुख्याध्यापकाने जबरदस्तीने वर्ग झाडून घ्यायला सांगितला. दरम्यान, त्याला विंचवाना दंश केला. पीडित मुलाच्या वर्गमित्रांनी ही माहिती दिली.

धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्याला विंचवाने दंश केल्यानंतर शाळा प्रशासनाने त्याला तात़डीने दवाखान्यात उपचारांसाठी नेण्याऐवजी एका मांत्रिकाकडे नेले. मात्र, मांत्रिकाच्या मंत्र-तंत्रानेही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तसेच प्रकृती अधिकच बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांना उशीर झाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनीच पीडित विद्यार्थ्याला वर्ग झाडून घेण्यास सांगितले होते. तसेच विंचू चावल्यानंतरही त्यांनीच त्याला मांत्रिकाकडे नेले होते. मात्र, मांत्रिक घरी नसल्याने मुख्याध्यापकांनी त्याला फोन केला त्यानंतर मांत्रिकाने मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरुन पीडित विद्यार्थ्याच्या कानात मंत्रपठन केले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही उलट बराच काळ उपचार मिळू न शकल्याने विद्यार्थ्याची प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या मृत्यूला शाळेचे मुख्याध्यापकच जबाबदार असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, झाशीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी मुख्याध्यापकाला निलंबित केले आणि चौकशीचे आदेश दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button