breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

“ओमिक्रॉन भारतासाठी गंभीर इशारा”, WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या…

नवी दिल्ली |

करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचे जगभर भय पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देखील ‘ओमिक्रॉन’ भारतासाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. एनडीटीव्हीशी बोलताना स्वामीनाथन यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि मास्क वापरण्यासाठी आवाहन केले आहे. मास्क “तुमच्या खिशातील लस” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्वामीनाथन म्हणाल्या, “ओमिक्रॉनशी लढण्यासाठी विज्ञान-आधारित धोरणाची गरज आहे. सर्व वयोवृद्धांचे संपूर्ण लसीकरण, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे, कोणतेही बारीत लक्षणे दिसली तर बारकाईने निरीक्षण करणे, गरजेचे आहे. तसेच ‘ओमिक्रॉन’ बाबत शास्त्रज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे चिंता कमी होऊ शकते.” स्वामिनाथन म्हणाल्या की, “हा प्रकार डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. अद्याप अधिकृतपणे काहीही सांगता येत नसले तरी आम्हाला काही दिवसांत या ओमिक्रॉनबद्दल अधिक माहिती मिळेल.”

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनला ‘चिंतेचे प्रकार’ म्हणून संबोधले आहे. हा कोविडच्या मागील प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. मात्र, तज्ञांना अद्याप ओमिक्रॉनच्या गंभीरतेचे स्वरुप स्पष्ट झाले नाही. यावर संशोधन सुरु आहे. मात्र, यापुर्वीची परिस्थिती पाहता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओमिक्रॉनच्या उदयामुळे जागतिक चिंता वाढली आहे. गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या रोगामुळे रखडलेल्या आर्थिक सुधारणा पुन्हा एकदा कोलमडण्याच्या मार्गावर असू शकतात. कारण या प्रकाराविषयीच्या चिंतेमुळे जगभरातील देशांमध्ये प्रवासी निर्बंधांची एक नवीन लाट असेल आणि आर्थिक बाजारपेठांमध्ये देखील याचे परिणाम होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button