breaking-newsताज्या घडामोडी

‘ते’ पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले…

पारनेर | पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा निर्माण झा होता. काही दिवसांपूर्वी थेट बारामती गाठत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र हा प्रवेश शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. यानंतर राजकीय वातावरण तापले. महाविकास आघाडीत काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा झाल्या. यानंतर आता शरद पवार, अजित पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी चर्चा करत हा तिढा सोडवला आहे. अखेर अजित पवारांनी या पाचही नगरसेवकांना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक आता शिवसेनेत परतले आहेत. या पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवबंधन बांधले. सर्व नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचं सांगितलं जात आहे. मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाचही नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी पाचही नगरसेवकांना मिलिंद नार्वेकरांकडे सोपवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button