breaking-newsआंतरराष्टीयमनोरंजन
एकाच भूमिकेसाठी इतिहासात दुसऱ्यांदाच ‘या’अभिनेत्याला ऑस्कर
नवी दिल्ली | ‘जोकर’ चित्रपटातील लक्षवेधी अभिनयासाठी जोकीन फिनिक्सला यंदाचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ९२ वर्षांच्या ऑस्करच्या इतिहासात दुसऱ्यांदाच एकाच भूमिकेसाठी अभिनेत्याला ऑस्कर मिळत आहे.
यापूर्वी दिवंगत अभिनेता हीथ लेजर यानं ‘जोकर’ हा खलनायक साकारला होता. त्याला जोकर या पात्रासाठी सर्वोत्तम अभिनयाचा ऑस्कर मिळाला होता. त्यामुळे जोकरची भूमिका साकारलेला आणि ऑस्कर पटकावलेला जोकीन फिनिक्स हा दुसरा अभिनेता ठरला आहे.
जोकीननं साकारलेला ‘जोकर’ हा जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडले. ऑस्करमध्ये एकूण ११ नामांकनं ‘जोकर’ला मिळाली. यापूर्वी जोकीन यानं सर्वोत्तम अभिनेत्याचा गोल्डन ग्लोबल, स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड आपल्या नावे केला आहे.