ओम साई फौंडेशन तर्फे पिंपळे गुरव येथे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचा सत्कार संपन्न
पिंपरी – कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊननंतर ७ जून पासून सर्वत्र काही प्रमाणात अनलॉक पद्धतीने शहर सुरळीत करण्यात येत आहे. त्याप्रमाणे ७ जून पासून शहरातील पीएमपीएमएल बसेसची प्रवाशांसाठी सार्वजनिक सुविधा नियम व अटी लागू करून बस सुरू करण्यात आल्या आहेत.
यांच्या मार्गदर्शना खाली व ओम साई फौंडेशन तर्फे पिंपळे गुरव येथील बस स्थानकावरील चालक, वाहक, व्यवस्थापक यांना पुष्प गुच्छ, सॅनिटायझर, मास्कचे वाटप संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संजय मराठे यांनी सांगितले की सार्वजनिक वाहतुकीचे काम सर्व पीएमपीएमएलचे कर्मचारी नियम पाळून जबाबदारीने करीत आहे. या कोरोनामुळे काही कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला होता. आपली जबाबदारी समजून हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. यासाठी आपल्याकडून यांच्याकरिता काही तरी देणे लागतो. सामाजिक भावनेतून मास्क, सॅनिटायझर, गुलाब पुष्प देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.
याप्रसंगी पीएमपीएमएलचे इन्स्पेक्टर मुरलीधर भवारी, वाहतूक नियंत्रक बाळासाहेब पाचरणे, वाहतूक नियंत्रक संजय हुलावळे, बुधाजी वाळकोळी, बस चालक सचिन सावंत, हनुमंत स्वामी, संभाजी वचकल, बस वाहक कविता खलसे, नरेश कालेकर आदी. कर्मचारी उपस्थित होते.