breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांच्या खाली

नवी दिल्ली – देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोना च्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडुन स्पष्ट करण्यात आलं आहे.

काल देशातील नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी एक लाखांच्या आत आल्याचं स्पष्ट झालं. 24 तासात अवघ्या 86 हजार 498 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर 24 तासात 1 लाख 82 हजार 282 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 2123 कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 51 हजार 309 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 13 लाख 03 हजार 702 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 89 लाख 96 हजार 473 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 23 कोटी 61 लाख 98 हजार 726 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button