breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रविदर्भ

अरेरे संतापजनक ः महाराष्ट्राच्या उपराजधानीत मेडिकल रुग्णालयात वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मुलीचा मृत्यू

नागपूर । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवी राजू बागेश्वर (17) असे या मृत मुलीचे नाव असून, ही यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथे राहणारी रहिवाशी होती. प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी व्हेंटिलेटर न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडून हरगर्जीपणा झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

आशियातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय अशी नागपूर मेडिकलची ओळख आहे. मात्र एका रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी व्हेंटिलेटर न मिळाल्याची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती बिघडल्याने तिला 15 सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 48 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीच्या दोन्हीही किडनी निकामी झाल्या होत्या. तिला श्वास घेताना त्रास होत होता. त्यामुळे वैष्णवीला व्हेटिंलेटरची आवश्यकता होती. मात्र, रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने अम्बू बॅगवर तिला ठेवण्यात आले होते. व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर शरद कुचेवार यांनाही कळवण्यात आले होते. पण त्यांनाही व्हेंटिलेटरची सोय करून देता आली नाही. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अनेक तास वाट पाहूनही तिला व्हेंटिलेटर मिळाला नाही. त्यानंतर अखेर शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.

आई-वडिल 20 तास अॅम्बु बॅगचा फुगा दाबून लेकीला कृत्रिम श्वास ते देत होते. मुलीच्या मृत्यूनंतर आई वडिलांनी आक्रोश केला. मुलीचा मृत्यू होईपर्यंत व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी वैष्णवीच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूला रुग्णालयाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे म्हचले. याशिवाय, अॅम्बु बॅग हाताने दाबून आमचा जीव जायची वेळ आली होती. पण लेकीला व्हेंटिलेटर मिळाले नाही, असेही तिच्या वडिलांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button