breaking-newsTOP NewsUncategorizedआरोग्यताज्या घडामोडीपुणे

आरोग्य टीप्स : चिया सिड्सचे फायदे जाणून घ्या ;हाडांना मजबूत बनवा, कोलेस्टेरॉल करा कमी…!

पुणे : मानवाची फर्टिलिटी पॉवर वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तसेच पचन आणि हाडांशी संबंधित समस्यांमध्येही चिया सिड्स फायदेशीर आहेत. या सीड आपल्याला केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवत नाहीत तर बर्‍याच आजारांपासून सुद्धा वाचवते.

जगभारात बरेच लोक असे आहेत जे फिट राहण्यासाठी वर्कआउट बरोबरच घरगुती उपचार देखील घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज चिया सिड्स खाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. फायबर, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, फॉस्फरस आणि अँटिऑक्सिडंट्स आदी चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित राहते. तथापि, चिया सिड्स खाण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आपल्या हाडांना ठेवते मजबूत-

चिया सिड्समध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही ते स्मूदीमध्ये किंवा फळांसोबतही खाऊ शकता.हाडांशी संबंधित अनेक आजारांवर याद्वारे मात करता येते.

कमी कोलेस्ट्रॉल-

तसेच त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला डिटॉक्स करतात आणि अतिरिक्त चरबी काढून टाकतात. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.चिया सिड्सचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार होत नाहीत.

प्रजनन शक्ती वाढवा-

कमी प्रजनन शक्तीमुळे गर्भधारणेमध्ये समस्या असल्यास, आहारात काही पदार्थांचा समावेश करून, आपण प्रजनन शक्ती वाढवून लवकर गर्भधारणा करू शकता. चिया सिड्स प्रजनन शक्ती वाढवण्यास मदत करतात. ओमेगा -3 आवश्यक फॅटी ऍसिड पुरुषांमध्ये ब्लड सर्कुलेशन सुधारते, जे प्रोस्टेटला आधार देण्यास मदत करते.

वजन कमी करण्यास उपयुक्त-

भरपूर फायबर आणि प्रथिने चिया सिड्समध्ये असतात. याच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि वजन पटकन कमी होण्यास मदत होते. यासोबतच अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर-

वाढत्या वयामध्ये चेहऱ्यावर असलेल्या सुरकरुत्या आणि बारीक रेषा देखील कमी करते. चिया सिड्स केसांसाठीही अधिक फायदेशीर आहेत.प्रोटीन आणि मॅग्नेशियम समृद्ध चिया सिड्स त्वचेला चमकदार आणि चांगले बनवते.

चांगल्या झोपेसाठी आवश्यक-

याच्या सेवनाने चिंता, तणाव आणि निद्रानाशाची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो.

जर तुम्ही निद्रानाश आणि तणावामुळे त्रस्त असाल तर चिया सिड्सचे सेवन करा. ते ओमेगा -3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध आहेत.

चिया सिड्स खातांना काळजी घ्या

एकाच वेळी खूप खाल्ल्याने ते घशात अडकू शकते, म्हणून त्यांचे सेवन काळजीपूर्वक करा. त्यांच्या लहान आकारामुळे ते घशात अडकू शकतात, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button