TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पदाधिकाऱ्यांनी वाहने केली जमा; महापौर दुचाकीवरून गेल्या घरी
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा रविवारी (दि.13) पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने महापौर उषा ढोरे यांनी वाहन महापालिकेकडे जमा केले. आपला मुलगा जवाहर याच्यासोबत दुचाकीवरून त्या घरी गेल्या. महापौरांनी जाताना सुरक्षा रक्षकांसोबत फोटो देखील काढले.
महापालिका दाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपला. रविवारी शेवटच्यादिवशी सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत महापालिकेच्या विविध विकास कामांची उद्घाटने, भूमिपूजने केली. 13 मार्चच्या सायंकाळी महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, विषय समिती सभापती प्रभाग समिती सभापतींनी आपली वाहने पालिकेच्या ताब्यात दिली. त्यांच्या कार्यालयांनाही टाळे ठोकण्यात आले.