TOP Newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडीपुणे

भारताची कसोटीसह मालिकेवर जबरदस्त पकड

आणखी एक निर्भेळ विजय केवळ 9 पाऊले दूर

पुणे |  बंगलोर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकन संघाचा  बंगलोर  पहिला डाव केवळ 109 धावात गुंडाळून आपल्या दुसऱ्या डावाला ९ गडी गमावून 303 धावांवर घोषित करून पाहुण्या संघावर 446धावांची मोठी आघाडी मिळवत या सामन्यावर आपली पकड आणखीन मजबूत करून मालिकाही आपल्या खिशात जवळजवळ घातलीच आहे.

भारताने आपला दुसरा डाव आजच्या दिवसाचा अगदी थोडाच खेळ बाकी असताना 303 धावावर घोषित करून पाहुण्या संघापुढे पुढील तीन दिवसात 447 धांवा काढण्याचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.ज्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने आजचा खेळ संपला तेंव्हा एक गडी गमावून 28 धावा केल्या असून त्यांना चमत्कार करण्यासाठी तब्बल 419 धावा हव्या आहेत, ज्या काढण्यासाठी त्यांना खरोखरच काही तरी चमत्कारच करावा लागणार आहे.

अपेक्षेप्रमाणे भारताने पाहुण्या संघांचा पहिला डाव आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच अगदी काही क्षणातच खतम करून पहिल्या डावात 143 धावांची मोठी आघाडी घेऊन या सामन्यावरही मजबूत पकड निर्माण केली आहे.वेगवान गोलंदाज आणि भारतीय संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहच्या एकूण नवव्या आणि मायदेशातल्या एका डावातल्या पहिल्या पाच बळीच्या कामगिरीमुळे श्रीलंका संघाचा पहिला डाव 109 धावातच संपुष्टात आला.

उत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात ऋषभपंतच्या 9 व्या आणि श्रेयस अय्यरच्या तिसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर सामन्यावरची आपली आघाडी मजबूत करून विजयाकडे दमदार पाऊल टाकले.पंतने आज तुफानी फलंदाजी करत केवळ 28 चेंडूतच अर्धशतक पूर्ण करताना महान अष्टपैलू कपीलदेवच्या या आधीच्या विक्रमाला नेस्तनाबूत करत या यादीत आपले नाव प्रथम क्रमांकावर सुवर्णाक्षरात क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात लिहले आहे.

कपिलदेवने 1982 साली पाकिस्तान विरुद्ध असेच आक्रमक खेळत केवळ 30 चेंडूत अर्धशतक केले होते तर पंतने आज केवळ 28 चेंडूत भारता तर्फे सर्वाधिक वेगवान अर्धंशतक पूर्ण करताना 7 खणखणीत चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले.

आज सकाळी श्रीलंका संघाने कालच्या सहा बाद 86 वरून पुढे खेळायला सुरुवात केली,पण आज बुमराहने त्यांच्या शेपटाला जराही वळवळू दिले नाही. पाहुण्या संघासाठी एकमेव आशा असणाऱ्या डिकवेलाची एकाकी झुंझार खेळी त्याने संपुष्टात आणली, त्याबरोबरच त्याने फक्त 28 धावा देत पाच गडी बाद करण्याची मोठी कामगिरीही केली,विदेशात अशी कामगिरी 8 वेळा करणाऱ्या बुमराहने आज पहिल्यांदा मायदेशी अशी कामगिरी केली आहे.त्याला अश्विन आणि शमीने दोन दोन बळी घेत चांगली साथ दिली,ज्यामुळे श्रीलंका संघाचा पहिला डाव केवळ 109 धावातच समाप्त झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button