breaking-newsक्रिडा

#NZvSL : न्यूझीलंडची 296 धावांची आघाडी, टाॅम लाथम नाबाद 264*

  • तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका 3 बाद 20

वेलिंगटन – टाॅम लाथमच्या व्दिशतकांच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरूध्दच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सर्वबाद 578 धावा करत श्रीलंकेवर 296 धावांची आघाडी घेतली आहे. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 3 बाद 20 धावांपर्यत मजल मारली असून श्रीलंका अजूनही 276 धावांनी पिछाडीवर आहे.

View image on Twitter

Sri Lanka Cricket

@OfficialSLC

Day 3, Stumps: Sri Lanka 282 & 20/3 (12 ovs) Kusal Mendis 5*, Angelo Mathews 2*, Sri Lanka trail by 276 runs. #NZvSL

तिसऱ्या दिवशी 2 बाद 311 वरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा पहिला डाव 578 वर आटोपला. टाॅम लाथमने नाबाद 121 वरून पुढे खेळताना आपले व्दिशतक पूर्ण केले. त्याने नाबाद 264 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून केन विलियमसन 91, हेनरी निकोल्स 50, राॅस टेलर 50, काॅलिन ग्रैडहोम 49 आणि जीत रावलने 43 धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमारा याने सर्वाधिक 4 गडी बाद केले.

आज श्रीलंकेची 3 बाद 20 अशी अवस्था झालेली असून श्रीलंका अजूनही  276 धावांनी पिछाडीवर आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कुसल मेंडिस 5 आणि एंजेलो मैथ्यूज हा 2 धावांवर खेळपट्टीवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साउदीने 2 तर ट्रेंट बोल्टने 1 गडी बाद केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button