breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

३ ते ४ टक्के लोक कर भरतात म्हणणाऱ्या कंगनावर ज्वाला गुट्टाची जोरदार टीका…

महाईन्यूज |

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान करणाऱ्या घटनाही घडलेल्या आहेत. देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर अभिनेत्री कंगना रणौतनं आंदोलकांना सुनावलं होते. त्यावर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं कंगनाच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. कंगनाचा ‘पंगा’ हा सिनेमा येत आहे. त्याच्या प्रमोशनदरम्यान कंगनाला देशात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी विचारण्यात आलेल होतं, त्यावर कंगना म्हणाली, “जेव्हा तुम्ही आंदोलने करता तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हिंसक व्हायला नको. आपल्या लोकसंख्येच्या ३ ते ४ टक्के लोक फक्त कर भरतात. बाकी लोक त्या करावर जगतात. तुम्हाला बस, रेल्वे जाळण्याचा अधिकार कोणी दिला? एका बसची किंमत जळपास ७० ते ८० लाख रुपये असते. ही रक्कम छोटी नाही. तुम्ही कधी आपल्या देशातील लोकांची परिस्थिती पाहिली आहे का? काही लोक उपाशी आणि कुपोषणानं मरतात,” असं कंगना म्हणाली होती.

कंगनाच्या भूमिकेवर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं टीका केलेली आहे. ‘देशातील लोकसंख्येच्या ३ ते ४ टक्के लोकच फक्त कर भरतात,’ या कंगनाच्या दाव्याला ज्वालानं ट्विट करून उत्तर दिलेलं आहे. “प्रत्येक भारतीय हा करदाता आहे,” असं उत्तर ज्वाला गुट्टानं ठणकावून कंगनाला दिलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button