breaking-newsक्रिडा

#AusvInd : भारत पराभवाच्या छायेत; चौथ्या दिवसअखेर भारत 5 बाद 112

  • भारताला विजयासाठी आणखी 175 धावांची आवश्यकता

पर्थ – भारताला दुसऱ्या कसोटीत विजयासाठी 175 धावांची आवश्यकता असून चौथ्या दिवसअखेर भारताने 5 बाद 112 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर तंबूत परतल्याने भारत पराभवाच्या छायेत आहे.

दरम्यान मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डाव्यात 243 धावांवर रोखण्यात भारताला यश आले. पहिला डावातील 43 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 243 धावा मिळून दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 287 धावांचे आव्हान मिळाले आहे. विजयासाठी 287 धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था बिकट झाली आहे.

भारताचा सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला असून तो शून्यावर माघारी परतला आहे. तर मुरली विजय 20, चेतेश्वर पूजारा 4, विराट कोहली 17 आणि अंजिक्य रहाणे 30 धावांवर तंबूत परतला आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर झाल्या आहेत.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ICC

@ICC

Lyon and Hazlewood strike in the final session of day four to put Australia in a strong position to level the series in Perth. India are 112/5 at stumps, needing 175 runs on the final day to claim victory.#AUSvIND scorecard ➡️ http://bit.ly/AusvInd5 

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून नाथन लायन आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी 2 तर मिचेल स्टार्कने 1 गडी बाद केला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हनुमा विहारी नाबाद 24 आणि ऋषभ पंत नाबाद 9 धावांवर खेळपट्टीवर टिकून आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button