breaking-newsमनोरंजन

आता जान्हवी कपूरसोबत झळकणार अंगद बेदी

“धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरने आता धर्मा प्रॉडक्‍शनसोबत आपला तिसरा चित्रपट साईन केला आहे. हा चित्रपट भारतीय हवाई दलातील पायलट गुंजन सक्‍सेना यांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजते. करण जोहरच्या मते या चित्रपटातील भूमिका जान्हवी कपूर यशस्वीपणे साकारू शकते.

या चित्रपटात मल्लाळम अभिनेता दुलकर सलमान झळकणार होता. मात्र, त्याच्या जागी आता अंगद बेदी काम करणार असल्याचे समजते. या चित्रपटात तो जान्हवीसोबत रोमांस करताना दिसणार आहे. मात्र, दुलकरच्या जागी अंगदला का रिप्लेस करण्यात आले हे समजू शकले नाही.

दरम्यान, अंगद बेदीने यापूर्वी “सूरमा’ आणि “टायगर जिंदा है’ या चित्रपटात काम केले आहे. आता चाहत्यांना अंगद-जान्हवी जोडीला एकत्रितपणे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, गुंजन सक्‍सेना भारतीय हवाई दलातील त्या विशेष पायलटांपैकी एक आहेत ज्यांनी कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button