breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

अकार्यक्षम केंद्र सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आली !

  • कविता आल्हाट यांची टीका : महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पिंपरी : 400 रुपये असलेला सिलेंडर 1000 पार गेला. अन्नधान्य खिशाला परवडत नाही. इंधन, खाद्यतेल सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. याला सर्वस्वी केंद्राचे कचखाऊ धोरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. अशा या अकार्यक्षम केंद्र सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी पिंपरी येथे केली. नागरिकांनो थोडा धीर धरा, आता ‘पवार पर्व’ सुरू होणार आहे असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांनी एक हजारचा टप्पा ओलांडला आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या भाववाढी विरोधात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने अनोखे आंदोलन केले. रविवारी (दि. 15) सायंकाळी साडेपाच वाजता सिलेंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यानंतर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने आंदोलन केले.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने राष्ट्रवादीच्या खराळवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सिलेंडरची अंत्ययात्रा काढली. तिरडीवर सिलेंडर बांधण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘राम नाम सत्य है’ असे म्हणत ही अंत्ययात्रा काढली.

  • केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी…

पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘एक दोन तीन चार, मोदी सरकार लै बेकार’, ‘ईडी जिसकी मम्मी है, वो मोदी सरकार निकम्मी है’, ‘करोना से भारी, पेट्रोल डिजल की महामारी’, ‘वा रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’, ‘जनता त्रस्त केंद्र सरकार मदमस्त’, ‘पड रही महंगाई की मार, चूप क्यों है केंद्र सरकार’ अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

  • महागाईचा केला निषेध…

आंदोलनादरम्यान महिलांनी टाहो फोडून सिलेंडर दरवाढीबाबत निषेध केला. कमळाबाईने घात केला. 400 रुपये असलेला सिलेंडर 1000 पार गेला, मोदींमुळे काय काय सोसावं लागतंय, मोदींनी काय करून ठेवलंय हे’ असे म्हणत महिलांनी टाहो फोडला. दरम्यान ‘पवार पर्व येणार’ असा विश्वास देखील यावेळी महिलांनी एकमेकींना दिला. महिलांनी भाज्या, खाद्यतेल, डाळ असे किराणा सामान ठेऊन महागाईचा निषेध केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button