breaking-newsमुंबईराजकारण

राष्ट्रपती राजवट लागू करणारे कोश्यारी आहेत तरी कोण? संघ अन् भाजपशी नातं काय ?

मुंबई – सत्तास्थापनेच्या तिढ्यात राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सत्तास्थापन करण्यात सर्व पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला. यानिमित्ताने भगत सिंह कोश्यारी हे राज्याच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आहेत तरी कोण? त्यांचा संघ आणि भाजपमधला प्रवास कसा झाला? याबद्दल जाणून घेऊयात.

राष्ट्रपती शासन सुरु झाल्याने राज्याची सर्व सुत्रे आता राज्यपालांच्या हाती आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कारकिर्दीवर एक नजर –

  • 17 जून 1942 ला उत्तराखंडच्या पालनधुरा गावात भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म
  • इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण 1964 मध्ये अलमोरा विद्यापीठातून पूर्ण
  • याच काळात कॉलेजचे सरचिटणीस म्हणून कोश्यारी निवडून आले होते
  • 1979 ते 1991 या काळात कुमाऊँ विद्यापीठाचे काऊन्सिलवर निवडून गेले
  • लहानपणापासून संघात कार्यरत, आणीबाणीच्या काळात इंदिरांविरोधात आंदोलनं
  • मिसा कायद्याअंतर्गत 1975 ते 1977 अशी दोन वर्ष तुरुंगवासही भोगला
  • 1997 साली भगत सिंह कोश्यारी पहिल्यांदा यूपी विधानसभेवर निवडून आले
  • यूपीच्या विभाजनानंतर 2000 साली उर्जा आणि सिंचन खात्याचे मंत्री झाले
  • 2001 – नित्यानंद स्वामी यांच्या जागी भाजपनं त्यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली
  • 2002 मध्ये उत्तराखंडमध्ये भाजप पराभूत, त्यानंतर 2007 पर्यंत विरोधी पक्षनेते
  • 2008 मध्ये भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले
  • 2014 मध्ये नैनीताल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले
  • 5 सप्टेंबरला विद्यासागर राव यांच्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल झाले
  • अविवाहित असलेल्या कोश्यारींनी पत्रकार आणि प्राध्यापक म्हणून काम केलं
  • ‘पर्वत पियुष’ नावाचं साप्ताहिक काढलं आणि चालवलंही
  • ‘उत्तरांचल प्रदेश क्यों?’ आणि ‘उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान’ ही दोन पुस्तकं लिहिली
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button