breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादीच्या स्वराज्यरक्षक स्टिकरला नितेश राणेंचे धर्मवीरने प्रत्युत्तर

अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज नावाचे 10 हजार स्टिकर वाहनांवर लावण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्यरक्षक स्टिकरला भाजपतर्फे धर्मवीर स्टिकरने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्गात वाहनांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नावाचे स्टिकर लावण्यात आले.
संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणारे अजित पवार यांना महाराष्ट्र धरणवीर नावाने ओळखेल. बहुजनांचे नाव वापरून सत्तेत येणारे आणि बुहजन कल्याणाची भाषा करणारे कधीही सर्वमान्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले नाही. त्यामुळे मुळातच औरंगजेबासोबत व्हॅलंटाईन डे साजरा करणाऱ्यांकडून या पेक्षा वेगळी अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.
सोबतच, भारतीय जनता पार्टी तर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नामोल्लेख असलेल्या स्टीकरचे आज प्रकाशन करून वितरण करण्यात आले. संभाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक व्यक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा शहराध्यक्ष मुळीक यांच्या नेतृत्वात पुणे शहरात आंदोलन करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button