breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘धडक’

पिंपरी । प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात शनिवारी सकाळी भेट दिली.
यावेळी कोविड-१९ वॉररुमची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदी उपस्थित होते.

४५ वर्षांपुढील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्या नागरिकांमध्ये कोव्हिड-१९ संक्रमणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणामुळे कोव्हिड-१९ पासून काही प्रमाणात बचाव होत असल्याचे निदर्शनास येत असून जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर आमचा भर राहील असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील कोव्हिड-१९ वॉर रूमला भेट दिली.

महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हिड-१९ वॉर रूमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह नगरससदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button