breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंचा पी.ए. राकेश परबला चार दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली | प्रतिनिधी 
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी राकेश परब(वय-३८ ) यांना कणकवली पोलिसांनी आज ४ फेबुवारी पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.आज सकाळीच कणकवली न्यायालयात हजर केले.सकाळीच आठ वाजता सुनावणी सुरू झाली.यानंतर अवघ्या दीड तासात राकेश परब याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सोमवारी तो स्वतःहून हजर झाल्यानंतर पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. सोमवारी सकाळपासून चौकशीअंती रात्री उशिरा अटक करण्यात आली होती.सोमवारी रात्री वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती.आज सकाळीच आठ वाजता त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयात सुनावणी सुरू झाली.आणी अवघ्या दीड तासात त्याला पोलीस कोठडी न्यायालयाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

नितेश राणेंना जामीन मिळणार की, अटक होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती.

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button