breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवड शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद

सकल मराठा समाजाकडून काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण

पिंपरी – पिंपरी  चिंचवड शहर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैकात मराठा आरक्षणासाठी बलिदान देणा-या कै.काकासाहेब शिंदे – पाटील या शिवरायाच्या मावळ्याला सर्व मराठा समाज बांधवाकडून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच शहरातील पिंपरी कॅम्प मार्केट, काळेवाडी, थेरगांव, चिखली, भोसरी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, वाकड, थेरगाव आदी ठिकाणी मराठा समाज बांधवाच्या हाके साथ व्यापा-यानी दुकाने बंद ठेवली. 

पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकातील शोकसभेला मराठा क्रांती मोर्चाचे मारुती भापकर, अभिमन्यू पवार, सतीश काळे, प्रवीण कदम, प्रवीण पाटील, जीवन बो-हा़डे, सचिन निबांळकर, अश्विन ढेमाले, अभिषेक मस्के, विक्रम नानेकर, नकूल भोईर, सुमन तांबे, प्रशांत कानडे, किशोर भंडारी, विनायक जगताप, प्रवीण लांडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मराठा समाज बांधवाच्या वतीने चिखली साने चाैक ते थॅरमॅक्स चाैकापर्यंत व्यापा-यांनी स्वताःहून दुकाने बंद केली. भोसरी, पिंपरी कॅम्प, काळेवाडी, थेरगांव, वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, डांगेचाैक, वाकडसह अन्य ठिकाणी मराठा समाजाकडून व्यापा-यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी अनेक व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा दर्शविला.

तसेच आषाढी एकादशी झाल्याने पंढरपुरातून सर्व वारकरी आपआपल्या घराकडे परतीच्या मार्गावर आहेत. या बंद कालावधीत मराठा समाजाकडून रहदारीला कोणताही अडथळा येवू नये, वारक-यांना त्रास होईल, असे वर्तन करु नये, या बंदमध्ये केवळ दुकाने बंद ठेवून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत पिंपरीतून निघालेला हा मोर्चा डांगे चाैकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जावून समारोप करण्यात आला.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शासनाने मेगा भरती स्थगित करावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50 टक्के सवलतीती अंमलबजावणी न करणा-या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या 16 टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रुपांतरण करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी बॅंकाना सक्तीचे आदेश द्यावेत. अशा विविध मागण्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button