breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘पोलीस काय करणार? भाषण रेकॉर्ड करून बायकोला दाखवतील’; नितेश राणेंचं वादग्रस्त विधान

मुंबई | गेल्या काही दिवसांपुर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, असं चिथावणीखोर विधान केलं होतं. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर आता नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांसदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

नितेश राणे म्हणाले की, मला काही करु शकणार नाही. माझ्या कुठल्याही वक्तव्यावर पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही. पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करु दे. जास्तीत जास्त बायकोला दाखू शकणार आणि काही करु शकणार आहे. आमच्या राज्यात आमच्यावर काय करु शकाल. जागेवर राहायच आहे. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे तुमच्या इथे अतिक्रमण सुरु आहे.

हेही वाचा     –      ‘राजकारणासाठी व्यक्तिगत नाते तोडू नये’; जयंत पाटलांचा अजितदादांना टोला 

तुम्ही काही चिंता करु नका. हे सरकार हिंदुत्ववाद्याचे आहे. सरकारमध्ये असे पर्यंत कुठल्याही हिंदूला कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही अशी ताकद आम्ही हिंदूंच्या मागे उभी केली आहे, असंही नितेश राणे म्हणाले.

नितेश राणेंच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा..पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button