breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर जीम सोबत सामान्यांसाठी लोकलचे दरवाजे ही खुले होणार?

महाराष्ट्रात 15 ऑगस्टच्या चांगल्या मुहूर्तावर जीम सुरू करण्याबाबत सकारात्मक बातमी दिली जाणार असल्याचं आज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्याचवेळी सामान्यांसाठी लोकलचे दरवाजे कधी उघडणार, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी दोन दिवस थांबा असे सांगून त्यांनी मोठे संकेत दिले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्राच्या गाइडलाइन्सनुसार राज्यात जीम सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्याचवेळी जीम चालकांकडूनही सातत्याने याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने जीम सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आज महत्त्वाची माहिती दिली. जीम चालक व इतरांकडून होत असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यात जीम सुरू करण्यास परवानगी देण्याचे निश्चित करण्यात आहे. मी कालच याबाबतच्या फाइलवर सही केली आहे आणि ही फाइल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीने अगदी उद्याच १५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर राज्यात जीम सुरू करण्याची परवानगी मिळेल, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलसेवा सुरू आहे. बाकी प्रवाशांसाठी लोकलची दारे बंद आहेत. बहुतेक कार्यालये व व्यवहार सुरू झाले असल्याने कामावर जाणाऱ्या सर्वांचीच लोकलअभावी कोंडी होत आहे. या प्रश्नावर नालासोपारा येथे रेल्वे रुळांवर उतरून हजारो प्रवाशांनी संतप्त आंदोलनही केले होते. लोकल पूर्ववत सुरू करा, अशी मागणी जोर धरत आहे. या अनुषंगाने लोकल नेमकी कधी सुरू होणार असे विचारले असता वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. मुंबईतील उपनगरीय लोकलसेवेबाबत प्रमुख मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. दोन दिवसांत याबाबत पुन्हा बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button