breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत घरगुती गणरायांना निरोप, घाटावर विसर्जनासाठी गर्दी

पिंपरी – ढोलताशाचा दणदणाट… पारंपरिक वेशभूषा… आणि फुलांची उधळण करीत पिंपरीतील गणरायांची मिरवणूक थाटात सुरू आहे. तत्पुर्वी म्हणजे सायंकाळी पाच वाजतापासूनच मिरवणुकीला तुरळक प्रमाणात सुरूवात झाली. मात्र, घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन दुपारपासूनच करण्यात आले. पिंपरीतील नागरिकांनी झुलेलाल घाटावर गणरायांची आरती करून निरोप दिला.

दुपारी चारनंतर घरगुती गणपती विसर्जनाला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली. काळेवाडी, पिंपरी, भाटनगर, रमाबाईनगर, पिंपरी कॅम्प भागातील नागरिक आपल्या घरगुती बाप्पांना घेऊन घाटावर येत होते. कोणी वाजतगाजत आणत होते. तर, परिवारातील मंडळी मोरया रे बाप्पा मोरया रे… अशी गीते गात येत होती. लहान मुलांसह महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात विसर्जनाची तयारी केली होती. रमाबाईनगरातील विश्वनाथ मांडरे यांनी आपल्या घरगुती गणरायांना वाजत गाजत घाटावर आणले. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील महिलांच्या एका छोट्या मंडळाने भंडा-याची उधळण करीत बाप्पांना हातगाडीतून घाटावर आणले.

मोठ्या भक्तीभावाने सर्वांनी अगरबत्ती, धुपार्ती लावून गणरायांची आरती गायली. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासा्ठी घाटावर हौद बांधला होता. काहींनी घरगुती गणपती हौदात विसर्जीत केले. तर, काहींनी गणेशाच्या मोठ्या मुर्ती नदीपात्रात विसर्जीत केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button