पिंपरी / चिंचवड

दरोड्याच्या तयारीत असलेल्या नऊ जणांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

आळंदी-चाकण रोडवर एका हॉटेलसमोर दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेल्या नऊ जणांना आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. या अटक केलेल्या आरोपींमध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 2) पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली.

सागर मोहन साबळे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. खेड), कलीम बादशा शेख (वय 21, रा. चिंचगव्हाण, ता. माजलगाव, जि. बीड), विलास दत्तात्रय वाघमोडे (वय 24, रा. लक्ष्मीनगर, मोशी), तेजस रवींद्र आल्हाट (वय 21, रा. आल्हाटवाडी, मोशी), योगेश संजय हनुमंते (वय 26, रा. डुडुळगाव, ता. हवेली), वैभव बबन कांबळे (वय 21, रा. भीमनगर, मोशी), रोहित रामदास वाजे (वय 27, रा. सस्तेवाडी, मोशी), विशाल केशवराव जाधव (वय 22, रा. लक्ष्मीनगर, मोशी), काजल दीपक देसाई (वय 24, रा. वडगाव रोड, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई कैलास गर्जे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी-चाकण रोडवर बुधवारी रात्री गस्त घालत असताना हॉटेल रमेश इनच्या समोर लाईटच्या आडोशाला काहीजण संशयितरित्या थांबले असल्याचे आळंदी पोलिसांना दिसले. पोलिसांनी कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक नकली पिस्तुल, सहा मोबाईल फोन, नंबर नसलेली दुचाकी, एक कोयता, लाल मिरची पूड, नायलॉन दोरी असा दोन लाख एक हजार 155 रुपयांचा ऐवज आढळून आला. त्यावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बापू जोंधळे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button