breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हडपसरच्या आमदारावर तक्रारदाराचे पाय धरण्याची वेळ; व्हिडिओ व्हायरल

पुणे, (महा-ई-न्यूज) – हडपसर विधानसभा मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे काम होत असताना दि. 7 सप्टेंबर रोजी 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे (सर्व रा. कोंढवा बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आमदार टिळेकरांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. या प्रकरणातून स्वतःला वाचविण्यासाठी आमदार टिळेकर यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र बराटे यांचे चक्क पाय धरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रविंद्र लक्ष्मण बराटे (55, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी फिर्याद दिली असुन पोलिसांनी भादंवि कलम 385, 379 , 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही गुन्हा दि. 7 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज-कोंढवा रोड परिसरात घडला आहे. फिर्यादी हे इ व्हीजन टेलि इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्‍ती व आयटीआय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.

दि. 7 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज-कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालु असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिली. त्यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली आहे. फिर्यादीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी सारखा गंभीर गुन्हा भाजपच्या आमदारावर दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

तथापि, माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र बराटे यांनी दाखल केलेली तक्रार मागे घ्यावी, यासाठी आमदार योगेश टिळेकर हे बराटे यांची भेट घेऊन तक्रार मागे घेण्यासाठी पाय धरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button