ताज्या घडामोडीमुंबई

रविवारपासून ठाण्यातील साकेत पुलाजवळच्या वाहतुकीत बदल

ठाणे | येत्या ६ मार्चपासून ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. या मार्गावरील ठाणे ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.

या बदलानुसार मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाजवळून साकेत संकुलाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर अशा वाहनांना खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच बाळकुमहून मुंबई-नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साकेत पुलाखाली प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने महालक्ष्मी मंदिरासमोरून उजवीकडे वळण घेऊन अग्निशमन केंद्रासमोरून माजिवडा पुलाखालून मार्गक्रमण करू शकतील. नाशिक-मुंबई महामार्गावर होणारी सततची वाहतूककोंडी सोडविण्यासाठीच हे रस्ता रुंदीकरण काम हाती घेण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button