breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

गवा अधिवासात परत जावा यासाठी कोल्हापुरात रात्रीस खेळ चाले; पहाटे आणखी एका रान गव्याचे दर्शन

कोल्हापूर |

कोल्हापूर शहरात आलेला गवा परत जाऊन चार दिवस उलटण्यापूर्वच शहरात आणखी एक गवा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक कार्यालय, जयंती नाला परिसरात तो दिसून आला. शासकीय यंत्रणा रात्रभर गवा अधिवासात परत जावा यासाठी प्रयत्नशील होती. पहाटे तो वडणगेच्या दिशेने रवाना झाल्याचे सूत्रांनी सकाळी सांगितले. याआधी कोल्हापूर शहरात चार दिवसापूर्वी पंचगंगा नदी परिसरात गवा आढळला होता. लोकांचा उपद्रव होऊ नये यासाठी गायकवाड वाडा परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली होती. दिवसभर प्रयत्न केल्यानंतर रात्री गवा अधिवासात निघून गेला होता. यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी गवा दिसून आला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

दरम्यान बुधवारी रात्री उशिरा आणखी एक गवा कोल्हापूर शहरात दिसून आला. सुरुवातीला तो महाडिक वसाहत येथे दिसला. नंतर तो विवेकानंद महाविद्यालय भागात दिसला. तेथून गवा गोकुळ दुध संघ,पोलीस उपअधीक्षक कार्यालय, दत्ताबाळ मिशन, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जयंती नाला परिसरात गेला. तेथून सीपीआर रुग्णालय, बुधवार पेठ येथे फिरून तो पुन्हा जयंती नाला परिसरात आला.

गवा अधिवासात परत जावा यासाठी रात्रभर त्याच्या मागावर शासकीय यंत्रणा होती. पोलीस, अग्निशामक दल, आपत्ती निवारण विभाग व वन विभागाचे कर्मचारी रात्रभर गवा अधिवासात परत जावा यासाठी प्रयत्नशील होते. पहाटे तो अधिवासात दिल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, जंगल, अभयारण्य परिसरातील गव्यांचा वावर शेतीवाडीत वाढू लागल्याने लोक जीव मुठीत घेवून राहत आहेत. यामुळे ऐरवी शांत असणारा, गवा भीतीचे कारण ठरला आहे. गव्याचा बंदोबस्त करावा, या मागणीचा रेटा लोकप्रतिनिधींना शासनाकडे वाढत आहे. शासन सुद्धा काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button