breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

मुंगूसांच्या केसांचे ७३५ पेंटींग ब्रश हस्तगत, पाच जण ताब्यात

कराड |
मुंगूस या वन्यप्राण्याच्या केसांपासून बनवलेले रंगकामाचे एक हजार ७३५ ब्रश जप्त करताना, रंग साहित्य विक्रेत्या पाच जणांना ताब्यात घेण्याची कारवाई आज बुधवारी कराड व शेजारील मलकापूर शहरामध्ये करण्यात आली. सातारचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांच्या संयुक्त पथकाने एकाच वेळी पाच ठिकाणी टाकलेल्या या छापासत्रामुळे रंग विक्रेता वर्गामध्ये एकच खळबळ उडाली. या बेधडक कारवाईमध्ये शिवानी पेंट्समधून ९२ ब्रश जप्त करताना राजेंद्र विठ्ठल सुपनेकर ( वय ३७ रा.मलकापूर ता. कराड ), देवकर पेंट्समधून ४४७ ब्रश हस्तगत करून, संदीप किसनराव देवकर ( वय ४५ रा. शनिवार पेठ, कराड ) यांना ताब्यात घेण्यात आले. सनशाईन पेंट्समधून २१२ ब्रश जप्त करताना तोहीम नजीर शेख ( वय- ३९ रा.वाघेरी, ता. कराड )

भारत पेंट्समधून १६३ ब्रश हस्तगत करून नविद वाईकर ( वय २४, कराड ) तसेच सह्याद्री पेंट्समधून सर्वाधिक ८२१ ब्रश जप्त करताना दुकान चालक अखतर सिराज वाईकर ( वय ५१, रा. कराड ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पाचही जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ३९ , ४९ ब ५० ,५१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंगूस हा वन्यजीव असून, निसर्ग साखळीत हा किडे खाऊन एक महत्वाची भूमिका बाजावतो. पण, काही लोक या निरुपद्रवी प्राण्यास मारून त्याच्या कातडी व केसांपासून असे ब्रश बनवतात व आर्थिक स्वार्थ साधतात. सदर ब्रश हे रंगारी व कलाकार वापरतात. तरी असे ब्रश बाळगणे, व त्याची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १८७२ नुसार सदर मुंगूस प्राणी हा शेड्युल २ भाग २ मध्ये येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button