breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदित्य बिर्ला रुग्णालय विरोधात डॉक्टरांचे धरणे आंदोलन सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना काळातील शिफ्ट लादणे, क्वारंटाई व्यवस्था, महिला कर्मचा-यांची असुरक्षितता अशा कारणांवरून थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले. यापूर्वी आरोग्य सेवक आणि स्टाफ नर्स यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाकडून कर्मचा-यांवर होणा-या अन्यायाविरोधात कर्मचारी समोर येत असल्याचे दिसत आहेत.

सक्तीची ड्युटी, क्वारंटाईन सुविधा, रोटा पॅक्ट, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि ड्युटी करण्यासाठी केली जाणारी सक्ती यामुळे मानसिक ताण येत आहे. तरीही बिर्ला हॅास्पिटल कडून कामावर हजर राहण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप डॅाक्टरांनी केला आहे. सात दिवस कोरोना रूग्णांची ड्युटी केल्यानंतर लगेच नॅान कोरोना रूग्णांची ड्युटी लावली जात आहे.

कोरोना चाचणीसाठी पैशांची मागणी केली जात आहे. क्वारंटाईन असलेल्या डॉक्टरांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण होण्याअगोदरच कामावर हजर राहण्यासाठी दबाव आणला जात आहे. डॉक्टरांसाठी क्वारंटाईनची सुविधा असलेला वेगळा विलगीकरण कक्ष मागणी करून देखील उभारला नसल्याचे या डॉक्टरांनी म्हटले आहे.

काही डॉक्टरांची चाचणी केल्यानंतर सुद्धा चाचणी अहवाल येईपर्यंत काम करा, काही होत नाही, असे सांगितले जात आहे. तसेच, चाचणी पॅाझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सांगितले जात नाही. अशामुळे संसर्ग पसरण्याची आणखी दाट शक्याता आहे. आणि हॅास्पिटलच जर संसर्गाचा केंद्र बिंदू बनत असेल तर ती चांगली बाब नसल्याचे डॉक्टर म्हणाले.

महिलांच्या सुरक्षेसाठी हॅास्पिटल कडून काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यांच्यासाठी चेंचींग रूम, स्वच्छता गृहांची नीट व्यवस्था नसल्याचा आरोप महिला डॉक्टरांनी केला आहे. तसेच हॅास्पिटल निकृष्ट दर्जाचे जेवण देत असून कॅटिंन मध्ये बाहेरचे जेवण आणू दिले जात नाही. सलग ड्युटी करून मानसिक ताण तर येतो.

हजेरीसाठी पंचिंग करू देत नाहीत त्यामुळे आमच्या पगारातून पैसे कपात केली जात आहे. आम्ही काम करण्यासाठी तयार आहे पण व्यवस्थापनाने आम्हला काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण पुरवावे तसेच याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button