breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जुन्या वाहनांना नवीन नंबर प्लेट बंधनकारक होणार..!

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर २०१८ मध्ये वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांसाठी सुरू झाली. नव्या वाहनांना उत्पादकांनी किंवा वितरकांनी या पाट्या बसवून देणे बंधनकारक करण्यात आले. केंद्र सरकारने जुन्या वाहनांनीही उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बंधनकारक केल्या आहेत. प्रत्येक राज्याने याची अंमलबजावणी करावयाची आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारला याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

देशभरात एप्रिल २०१९ नंतर नवीन वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बंधनकारक करण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने जुन्या वाहनांनाही या क्रमांक पाट्या बंधनकारक केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारला याबाबत प्रस्ताव पाठविला असून, लवकरच त्यावर निर्णय अपेक्षित आहे.

हेही वाचा – मराठा समजाला पुन्हा फसवणार आहात का? मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर काँग्रेस नेत्याचा सवाल

उच्च सुरक्षा क्रमांक पाटी ही थ्रीडी होलोग्राम स्टीकर असते. त्यावर वाहनाच्या इंजिनाचा क्रमांक आणि वाहनाचा सांगाडा क्रमांक असतो. या पाट्यांमध्ये बदल करता येत नाही आणि त्यांचा आकारही बदलता येत नाही. या पाटीवर बारकोड असून, आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांनी स्कॅन केल्यास वाहनाबाबतची संपूर्ण माहिती मिळते. पाटीवर एक इलेक्ट्रॉनिक चिप आणि गोपनीय क्रमांक असतो, तो वाहनाशी जोडलेला असतो. हा गोपनीय क्रमांक एकदा वाहन पाटीशी जोडला गेल्यानंतर दोन्ही बाजूने लॉक होतो. त्यानंतर कोणीही ते लॉक उघडू शकत नाही. या पाट्या ॲल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनवलेल्या असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button