breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नवी दिल्लीत प्रदूषणामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत फटाके खरेदी व विक्रीवर बंदी- दिल्ली पोलिस

नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील प्रदूषण मात्र दिवसेंदिवस अतिशय खराब होत चालले आहे. या प्रदूषणामुळे दिल्लीकरांना अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वाचा साराचार विचार करता दिल्ली पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. दिल्लीतील खराब प्रदूषण पाहता 30 नोव्हेंबर पर्यंत फटाके खरेदी करण्यास वा त्याची विक्री करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे. जर नियमांचे उल्लंघन करुन असे प्रकार कोणी करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button