breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीत शिवसेनेला कुणी गृहीत धरू नये”; नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य

मविआकडून लढताना दोन्ही जागांसाठी शिवसेना आग्रही

पिंपरी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आता मैदानात उतरला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीत शिवसेनेला कुणी गृहीत धरू नये, असं वक्तव्य विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

महाविकास आघाडीची वाटचाल चांगली आहे. कालच्या विधानपरिषदेच्या निकालावरुन हे स्पष्ट झाले. कसबा पेठ, चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक मविआ एकत्रित लढविणार आहे. मविआकडून लढताना या दोनही जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेनेला कुणी गृहीत धरू नये, जागांची ओढाताण, रस्सीखेच नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील. त्याचे तंतोतंत पालन केले जाईल, असे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आग्रही आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील नेत्यांची वाकडमध्ये बैठक झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर, शशिकांत सुतार, सुषमा अंधारे, आदित्य शिरोडकर, गौतम चाबुकस्वार, सचिन भोसले, राहुल कलाटे, अमित गावडे यांच्यासह आदी पदाधिकरी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button