breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजपाची मुसंडी; तेलंगणात काँग्रेसला बहुमत

Assembly Elections Results 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आकरा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेत

मध्य प्रदेश विधाससभेच्या २३० जागा आहेत. भाजपने १५५ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर

छत्तीसगड विधानसभेसाठी ९० जागांवर मतदान झाले. भाजपने ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे.

हेही वाचा  – तेलंगणामध्ये BRS आणि भाजपाची हातमिळवणी? BRS खासदाराचे सूचक विधान

राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर

राजस्थानमध्ये विधासभेच्या २०० जागा आहेत. त्यापैकी १९९ जागांवर मतदान झाले आहे. १९६ पैकी ११३ भाजपाने आघाडी घेतली आहे. तर ६९ काँग्रेस आघाडीवर आहे.

तेलंगणात काँग्रेसला बहुमत

तेलंगणात विधानसभेसाठी ११९ जागांवर मतदान झाले. काँग्रेस ६६ जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल करत आहे. बीआरएसने केवळ ४५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button