TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

4 किलो सोन्याचा शर्ट घालणाऱ्या नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या घोटाळ्यात अटक

नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोल्डमॅन पंकज पारख यांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे.नाशिकच्या येवल्यातील उद्योजक आणि राजकारणी अशी पंकज पारख यांची ओळख आहे. त्यांनी 4 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला 1.30 कोटींचा शर्ट घातल्याने पंकज पारख यांच्या शर्टाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. यानंतर आता पंकज पार्क संचालक असलेल्या पतसंस्थेमध्ये 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप पंकज पारख यांच्यावर आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पंकज पारख यांना अटक केली आहे.

येवला येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालक मंडळावर 21 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे प्रशासक आणि सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. त्यामुळे या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पंकज पारख यांना नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. यानंतर पुढील तपासासाठी पारख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन जाण्यात आले आहे. आज शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कोण आहेत पंकज पारख?
पंकज पारख हे सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून कै. सुभाषचंदजी पारख पतसंस्थेचे संस्थापक आहेत. तसेच पारख हे येवला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षही आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टाने त्यांना गिनीज बुकमध्ये स्थान मिळवून दिले होते. पंकज पारख यांनी त्यांच्या वाढदिवशी सुमारे चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घातला होता. या शर्टची किंमत 1 ऑगस्ट 2014 रोजी अंदाजे 98 लाख, 35 हजार 99 रुपये होती.

पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार 21 कोटी 96 लाख 99 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर एका फ्लॅटमधून पारख यांना नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button