breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

कुटुंब आणि राष्ट्र सक्षम करण्यासाठी महिलांनी उद्योगात येण्याची गरज- एस.एस. सावंत

सेव इंडिया असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२

पुणे (प्रतिनिधी): महिलांचे उद्योग अथवा रोजगार मध्ये फक्त ३% समावेश असून तो वाढवायचा असेल, शासनाच्या धोरणा नुसार ९% करायचा असेल तर; सेव इंडिया असोसिएशन सारख्या संस्था महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रेरित आणि मदत करत असलेल्या कामामुळे महिलांचा व्यावसायिक क्षेत्रात प्रमाण वाढेल, असा विश्वास जिल्हा उद्योग विभागाचे प्रमुख संतोष गवळी यांनी व्यक्त केला.

सेव इंडिया असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू संस्कृतीक भवन येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाला; यावेळी संतोष गवळी बोलत होते. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, उद्योग, कृषीक्षेत्र आणि कलाक्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना समाजरत्न, उद्योगरत्न, कृषीरत्न, कलारत्न तसेच आदर्श संस्था, आदर्श माता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सेव इंडिया असोसिएशन अध्यक्षा श्रद्धा भोर, व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत, जिल्हा उद्योग समूहाचे अधिकारी संतोष गवळी, उमेद अभियानाच्या व्यवथापिका शिल्पा ब्राम्हने व किरण येनपुरे, कृष्णा थापाडे, मिनीनाथ वाकळे, सोमनाथ आलाम आदी उपस्थीत होते.

व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत म्हणाले, महिलांमध्ये शिकाऊ प्रवृत्ती प्रबल असते. जर त्यांनी एखाद्या क्षेत्रात उतरायचे ठरवलं तर नक्कीच येथे यश संपादित करू शकतात असा अनुभव माझा आहे. आजतागायत एक लाखाहून अधिक महिलांना श्रीयश एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय प्रशिक्षित केले असून त्यामधील हजारो महिला आज स्वबळावर उभ्या आहे, हे प्रमाण अजून वाढायला हवे. भारत देशाला एक नवीन दिशा देण्यासाठी महिलांनी उद्योग व्यवसायात उतरून प्रथम घरासाठी, नंतर कुटुंब आणि राष्ट्रासाठी आपले योगदान देण्यात सहभाग घेतला पाहिजे तरच घराची सोबतच या महान राष्ट्राची प्रगती होऊ शकते.

श्रद्धा भोर म्हणाल्या, समाजपद्धती आणि विचारपद्धती या दोन मोलाच्या गोष्टी आहेत. जर आपली विचारपद्धती बदलली तर नक्कीच समाज बदलेल असं मला वाटतं. आज त्याच समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना सेव इंडियाच्या वतीने राज्यस्तरीय गौरव पुरस्कार दिला गेला याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

सादर सोहळ्याचे सूत्रसंचलन अनिल रुपवनर पाटिल तर आभार श्रीराम सावंत यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button