breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

नागपूरचे गोरेवाडा प्राणीउद्यान पहिल्यांदाच पर्यटकांसाठी खुले

नागपूर – कोरोना आटोक्यात आल्याने नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालाय आणि उद्यान पर्यटकांच्या सफारीसाठी आजपासून सुरू झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च अखेरीस गोरेवाडा उद्यानातील सफारी बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागपूर लेव्हल वनमध्ये असल्याने लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.त्यानंतर हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले.

राज्यातील पहिली सफारी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आणि उद्यानात सुरू झाली. कोरोनाबाबतचे नियमांचे पालन करत आज पर्यटकासाठी सफारी सुरू झाली.पहिल्या सफारीपासूनच पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. आज पहिल्या सफारीत राजकुमार वाघाने दर्शन दिले. त्याची रुबाबदार बैठक पाहून पर्यटक खुश झाले.५अस्वल आज एकत्र मस्ती करताना आढळून आले. तर चार बिबटे खेळतानाचे दृश्य पर्यटकांना पाहण्यास मिळाले. आज पहिल्या दिवशी १५० सफारी बुकिंग झाल्या होत्या. मुंबई आणि शेजारील राज्यातूनही आज पर्यटक सफरीला पोहचले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button