breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास होऊ शकतो ‘इतक्या’ रुपयांचा दंड

Ambulance Traffic Rule : रस्ते अपघात कमी व्हावेत म्हणून बेशिस्त वाहनचालकांचा दंड वाढविण्यात आला. मात्र, अद्याप अपघात व अपघाती मृत्यू कमी झालेले नाहीत. दररोज बेशिस्त वाहनांना वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड केला जातो. पण, वेळेत दंड न भरल्यास पुन्हा तोच नियम मोडल्यास आपोआप दुप्पट ते दहापट दंड होतो ही वस्तुस्थिती आहे.

रुग्ण घेऊन जाताना किंवा रुग्णाला आणायला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. रुग्णवाहिका जात असताना वाट न देणाऱ्या वाहनचालकाला १० हजारांचा दंड होवू शकतो. दरवर्षी राज्यातील सरासरी ९८ लाख बेशिस्त वाहनांवर जवळपास बाराशे कोटींपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाते.

हेही वाचा – क्रिकेट तब्बल १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये परतणार, IOC ची अधिकृत घोषणा

अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका अशा आपत्कालीन वाहनांना मार्ग देणे बंधनकारक आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ अंतर्गत, वाहनचालकांनी आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास १०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button