breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘माझं तिकीट राज्याने ठरवलं नाही, मला मोदींनी जबाबदारी दिली’; पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबाबदारी दिली. माझं तिकीट राज्यानं नाही तर सर्वोच्च नेत्याने ठरवलंय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला लोकसभा लढवायची नव्हती. मी राज्यामध्ये चांगलं काम केलं. तिकीट जाहीर झाल्यानंतर मी बुद्धीने निर्णय घेतला आणि माझं मन कपाटात काढून ठेवलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उमेदवारी दिली आहे. माझं तिकीट राज्याने ठरवलेलं नाही. राज्याने नाही तर देशाने ठरवलं आहे. देशाच्या सर्वोच्च नेत्याने माझी उमेदवारी ठरवली आहे. त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल, असा मला विश्वास आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्या, एवढीच तुम्हाला विनंती करते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मला लोकसभा निवडणूक लढायची होती की नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती. का? कारण मी राज्यात काम करु इच्छित होते. माझ्या बहिणीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्षे काम केलं. माझं तिकीट जाहीर झालं. मला तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहुर उठलं की आपण काय करावं आता? माझ्यावर प्रेम करणारे लोकं नुसते बीड जिल्ह्यात नसून संपूर्ण राज्यात आहेत. आज ते टीव्हीवरुन मला बघत आहेत. या सर्व लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि बुद्धीनेच निर्णय घेणार आहे. बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कोणत्या कपाटात ठेवणार नाही. माझं मनसुद्धा त्या निर्णयात सहभागी आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा – ‘मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर उलट जास्त त्रास झाला’; वसंत मोरेंचं सूचक विधान

“आमचा विजय निश्चित आहे. उमेदवारी कुठून मागायची गरज पडली नाही. मी पराक्रम करू शकते. मी लग्नाला जावू शकत नाही. मी हॉस्पिटलचा फोन घेऊ शकत नाही. पण मी ऊसतोड कामगारांसाठी निर्णय घेऊ शकते. माझ्या एका सहीने ऊसतोड कामगार मजुरांना मदतीचे पैसे मिळू शकतात. माझ्या एका सहीने पीकविम्याचे पैसे मिळू शकतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या जातीवर का बोट ठेवलं जातं? असा देखील सवाल पंकजा मुंडे यांनी यावेळी केला. मी सत्तेत माऊली म्हणून काम केलं. मी तुम्हाला हक्कानं मतदान मागणार आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मराठा बांधवांचा आक्रोश खरंच खूप महत्वाचा आहे. कदाचित माझ्या माध्यामातून हा प्रश्न सुटणार आहे. जिल्ह्यात आम्ही मोठ बांधणार आहोत. पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत. बीड जिल्ह्याची शांती मला संपवायची नव्हती. समाजातील एकजीवता कुणाला तरी संपवायची आहे. कुणीतरी येवून जिल्ह्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. कुणीही आंदोलन केलं तरी आपल्याला चांगलं काम करायचं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button