पिंपरी / चिंचवड

भोसरीत पिकअपमध्ये एकाचा गळा आवळून खून

पिंपरी l प्रतिनिधी

भोसरी येथे एका व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी (दि. 2) दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश रघुनाथ भिलारे (वय 32) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार लाला हेमाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी परिसरातील श्रीकृष्णा पुरम जे ब्लॉक येथे एका बोलेरो पिकअप मध्ये अज्ञातांनी राकेश भिलारे यांचा गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजताच्या कालावधीत घडली. पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button