ताज्या घडामोडीपुणे

येत्या १५ मार्चपासून पुणे महापालिकेवर प्रशासक नेमणार! सरकारचे आदेश

पुणे | पुणे महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी आचारसंहिता लागणे शक्य नसल्याने आता या महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पुण्याचे प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.

कोरोना महामारी आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेल्याने राज्यात महापालिकांच्या निडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी-मार्च महिन्यात होऊन १३ मार्चपूर्वी नवी महापालिका अस्तित्त्वात येणे आवश्‍यक होते. मात्र, अद्यापही ही निवडणूक आणखी काही महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १४ मार्चनंतर पुणे पालिकेवर प्रशासक येणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे तत्काळ प्रशासक नेमण्यात यावा असे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत. १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम करणार आहेत. याबाबत विक्रम कुमार यांनीही दुजोरा दिला असून १५ मार्चपासून प्रशासक म्हणून काम करण्याचे आदेश मिळाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button