आंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

“दोन लाख रुपयांची खंडणी दे नाहीतर तुझ्या मुलाचा खून करेन”, सराईत गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पिंपरी : खंडणी न दिल्यास तुझ्या मुलाचा मर्डर करेन, अशी एका व्यावसायिकाला धमकी देत त्याच्या ऑफिसमधून जबरदस्तीने ४० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही घटना जानेवारी २०२२ ते १२ मार्च २०२३ या कालावधीत देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी संदीप ऊर्फ संजय आनंदा काळोखे (वय ४०, रा. तळवडे) यांनी शुक्रवारी देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सुधीर सोपान जाधव याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीस माझ्यावर मर्डर आणि रेपची केस असून, मी पिंपरी-चिंचवडचा भाई आहे. तुला प्लॉटिंगचा धंदा करायचा असल्यास मला दर महिना १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत गुगल पे नंबरवर फिर्यादीकडून ३८ हजार रुपये घेतले. परत आरोपी फिर्यादीच्या ऑफिसमध्ये आला त्याने टेबलाच्या ड्राव्हरमध्ये हात घालून ४० हजार रुपये काढून घेतले. तसेच आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागत पैसे न दिल्यास फिर्यादीस आणि फिर्यादीच्या मुलाला संपविण्याची धमकी दिली होती.
आरोपी सुधीर सोपान जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याच्या विरुध्द खून, बलात्कार व इतर असे एकुण ०५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे शाखा स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप- निरी.अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, आशिष बोटके, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button