breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपवाले चोरावर मोर आहेत, काँग्रेसचे सचिन साठे यांची टिका

  • निगडीतील आघाडीच्या सभेला सुरूवात
  • भाजप-शिवसेनेवर होतेय जोरदार फटकेबाजी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – उध्दव ठाकरे मोदींना म्हणतात चौकीदार चोर आहे. आणि भाजपवाले म्हणतात शिवसेना आमचा लहान भाऊ आहे. लहान भाऊ कसला भाजवाले तर चोरावर मोर आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी शिवसेना-भाजपवर टिका केली.

मावळ लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ निगडीतील आयोजित सभेत साठे बोलत आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, उमेदवार पार्थ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, शेकाप आणि आरपीआय (कवाडे गट)चे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत.

साठे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात एचएच्या कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटलेला नाही. शास्ती कर जशास तसा आहे. या सरकारने पाच वर्षात काय केले, असा प्रश्न पडला आहे. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटला म्हणून पेढे खालले. ढोलताशा आणि शंकनाद करण्यात आला. परंतु, खरी परिस्थिती लोकांना माहिती आहे. खोटं बोलून लोकांची दिशाभूल या सरकारने केली आहे.

भाजप-शिवसेनेची अशी ही बनवा बनवी

मोदी म्हणतात गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केले. काँग्रेसने लोकशाही जिवंत ठेवली. म्हणून तर चहावाला पंतप्रधान बनू शकला. असाही टोलाही साठे यांनी लगावला. गुजरातमध्ये पक्षाच्या कामानिमित्त फेरफटका मारला. तेव्हा तेथील जुन्या जाणत्या लोकांना विचारपूस केली. अख्या गुजरातमध्ये एकही व्यक्ती मोदींच्या हातचा चहा पिलेला सापडला नाही. मोदी आणि शहा यांच्याकडून नुसती बनवाबनवी सुरू आहे. भाजपची अशी ही बनवा बनवी सुरू आहे, अशीही टिका साठे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button