ताज्या घडामोडीराष्ट्रिय

घर घ्यायचंय? जाणून घेऊया कोणती बँक कमी व्याजदरात देते होम लोन

बँकांकडून देण्यात येणाऱ्या होम लोनच्या साहाय्याने तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तर वेगवेगळ्या बँकांकडून देण्यात येणारे होम लोन आणि त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल जाणून घेऊया. आपण कमी व्याजदरात कोणती बँक होम लोन देते हे जाणून घेऊया.

बँक ऑफ इंडिया 6.85 टक्के RLLR वर होमलोन देत आहे. बँक किमान 6.5 टक्के आणि कमाल 8.2 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र 6.8 टक्के RLLR सह होम लोन देत आहे. बँक त्यावर किमान 6.4 टक्के आणि कमाल 7.8 टक्के व्याज देत आहे. तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दरात होम लोन मिळेल.
युनियन बँक ऑफ इंडिया 6.8 टक्के रेपो लिंक्ड लेंडिंग रेटने होम लोन देत आहे. बँक किमान 6.4 टक्के आणि कमाल 7.25 टक्के दराने होमलोन देत आहे. तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असल्यास, तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर सर्वांत कमी व्याजदरांत खरेदी करू शकता.
कोटक महिंद्रा बँक सर्वात कमी दरात होम लोन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. बँक सध्या 6.50 टक्के RLLR सह लोन देत आहे. ही खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक आहे.
बँक ऑफ बडोदा होम लोन देण्यापूर्वी तुमच्या संपूर्ण क्रेडिट इतिहासाची तपासणी करते. त्यानंतर पात्र कर्जदारांना कमी दराने कर्ज देते. ही बँक 6.5 टक्के आरएलएआर दराने गृहकर्ज देत आहे. ही बँक घर खरेदीसाठी किमान 6.5 टक्के आणि कमाल 7.85 टक्के व्याजदराने कर्ज देऊ करत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button