breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला भरणार उमेदवार अर्ज, तर २९ तारखेला मोदींचा रोड शो अन् जाहीर सभा

पुणे : यंदा प्रथमच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा सामना कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी होणार आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. तर मुरलीधर मोहोळ आपला उमेदवारी अर्ज येत्या २५ एप्रिल रोजी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन भरणार असल्याची माहिती पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलीय.

पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय या महायुतीची महाबैठक रविवारी पुण्यात संपन्न झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा निवडणूक अर्ज भरण्यासंदर्भातील तयारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या २९ एप्रिलला पुण्यात होणारी जाहीर सभा याचं नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आलं.

हेही वाचा    –    भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश 

येत्या २५ एप्रिल रोजी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढून त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचा निवडणूक अर्ज भरण्यात येणार आहे‌. याच दिवशी निवडणूक अर्ज भरल्यानंतर डेक्कन येथील नदीपात्रामध्ये मुरली अण्णांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. अशी माहिती धीरज घाटे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर २९ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या (एसपी कॅालेज) मैदानावर होणार आहे. या सभेस सुरुवात होण्यापूर्वी बालगंधर्व येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यापासून जंगली महाराज रस्त्याने खंडोजी बाबा चौकापर्यंत आणि तेथून पुढे टिळक रस्ता मार्गे सर परशुरामभाऊ महाविद्यालयापर्यंत मोदीजींचा रोड शो होणार आहे. या जाहीर सभेला महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचेही धीरज घाटे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पुण्यात झालेल्या बैठकीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार  सुनील कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष  राजेश पांडे, संदीप खर्डेकर, श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  दीपक मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष  प्रमोद नाना भानगिरे,  अजय भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  साईनाथ बाबर,  बाबू वागस्कर, गणेश सातपुते, रिपब्लिकन पक्षाचे  संजय सोनवणे,  परशुराम वाडेकर, लोकजनशक्तीचे  संजय आल्हाट यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button