breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे | भोर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिले आहेत.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ३५-बारामती लोकसभा मतदार संघाअंतर्गत भोर विधानसभा मतदार संघातील सर्व ठिकाणी मंगळवार ७ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडील २२ मार्च २०२४ च्या परिपत्रकानुसार हे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा     –      ‘काँग्रेसने म्हटलं देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा’; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी किमान दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी.

या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधिताविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button