breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाबाबत महापालिका पदाधिकारी व प्रशासन असंवेधनशील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची टिका

पिंपरी / महाईन्यूज

मागील फेब्रुवारी महिण्यापासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. यातील बहुतांशी रुग्णांना सहा ते आठ रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडते. परंतू पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाने वाढणा-या रुग्णांची संख्या विचारात न घेता आवश्यक तेवढा इंजेक्शनचा साठा केला नाही. महापालिका पदाधिकारी व प्रशासनाची हि कृती म्हणजे असंवेधनशीलपणाचा कळस आहे. तसेच शहरातील औषध विक्रेत्यांवर महानगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक मागील आठवड्यापासून इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. या सर्व बाबींना पिंपरी चिचंवड महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनच जबाबदार असल्याची टिका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली.

शनिवारी (दि. 10 एप्रिल) राष्ट्रवादी शहर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वाकडकर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहर प्रवक्ते फझल शेख, राष्ट्रवादी युवक शहर सरचिटणीस प्रतिक साळुंखे, अजय तेलंग, राष्ट्रवादी शहर युवक उपाध्यक्ष प्रसाद कोलते आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. करोना साथीच्या काळात गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन जीवनदायी औषध ठरत आहे. मागील दहा दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात रोज अडीत ते तीन हजार रुग्ण कोरोना बाधित होत आहेत. शहरातील जवळ जवळ सर्व रुग्णालये संपूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. महानगरपालिका सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि प्रशासनाने रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात आवश्यक त्याप्रमाणात ठेवला नाही. प्रशासनाची हि कृती रुग्णाच्या जीवाशी खेळणारी आहे.

याची दखल घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी, सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाविरोधात महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन केले. आंदोलन चालू असताना समजले कि, महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले पालिकेच्या भांडारात मुबलक प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक आहे. आम्ही तात्काळ आरोग्य अधिकाऱ्याच्या कक्षात जाऊन त्यांना संबंधित विचारणा केली, परंतु त्यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक असल्याची कोणतीच माहिती मिळाली नाही. आरोग्य अधिकारी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होते हे आम्हाला स्पष्ट जाणवले. या संदर्भात भाजपचे सत्तारूढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले कि, महानगपालीकेच्या सर्व रुग्णालयांसाठी भांडार विभागाकडे ९०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. याचबरोबर बाहेरून वाढीव २०० रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांनी सांगितले कि, रेमडेसिवीर इंजेक्शनचा कुठेही तुटवडा निर्माण झाला नाही आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चमकोगिरी करण्यसाठी आंदोलन करत आहे.

शहरात करोनामुळे गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात धावपळ करीत होते आणि आजही तीच परिस्थिती आहे. खाजगी मेडिकल मध्ये देखिल रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीत. अश्या गंभीर परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांना फोन करून विनंती करत आहेत कि, कुठून तरी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून द्या. राष्ट्रवादी युवक आणि वरिष्ठ नेत्यांना दररोज कमीत कमी ३० ते ४० फोन रेमडेसिवीर इंजेक्शन मागण्यासाठी येत आहेत. युवक पदाधिकाऱ्यांना शहरात कुठेही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. युवकांना समजले, श्री नामदेव ढाके यांनी राणा भीमदेवी थाटात घोषणा करून सांगितले आहे कि महानगरपालिकेकडे ११०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. युवक पदाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले, ते रोज रेमडेसिवीर इंजेक्शन नागरिकांना मिळवून देण्यासाठी शहरात फिरत आहेत आणि त्यांना कुठेच इंजेक्शन मिळत नाही.

यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याचा दावा करणारे श्री नामदेव ढाके, यांचा संपर्क क्रमांक कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिला. यामागे संपूर्ण निर्मळ हेतू होता कि, श्री नामदेव ढाके त्यांच्या दाव्यानुसार अगतिकपणे शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी वणवण भटकत असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करतील. रुग्णांचे नातेवाईक श्री नामदेव ढाके यांना फोन करून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे म्हणून मदत मागू लागले. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या घोषणेनुसार या लोकांना महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्याकडे पाठवून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देणे अपेक्षित होते. परंतु असे न करता काल रात्री ते प्रसारमाध्यमांशी बोलले कि, माझा संपर्क क्रमांक सार्वजनिक करणाऱ्या राष्ट्रवादी युवक कार्यकारणीविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. याचा अर्थ असा कि, नामदेव ढाके रेमडेसिवीर  इंजेक्शनच्या महानगरकेकडील साठ्याच्या बाबतीत खोटे बोलत आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीचा संपर्क क्रमांक लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक करणे, आम्ही जनसेवेसाठीचे कर्तव्य मानतो.

या सेवेसाठी जर राष्ट्रवादी युवक कार्यकारणी कारागृहात जाणार असेल तर ती आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. श्री नामदेव ढाके आणि पोलीस आयुक्तांचे कष्ट वाचविण्यासाठी आम्ही स्वतः पोलीस आयुक्तांसमोर हजर होण्याचा विचार करत आहोत. आमच्या मते सत्ताधारी भाजप आरोग्य अधिकारी आणि श्री. नामदेव ढाके यांच्या माध्यमातून मूळ मुद्यापासून लक्ष हटविण्याचा प्रयत्न करत आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याचे मूळ कारण भ्रष्टाचार आहे. सत्ताधारी भाजपला जोपर्यंत पाहिजे तसे कमिशन मिळत नाही तोपर्यंत ते रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करत नाही. कोरोना साथीच्या या भयंकर परिस्थितीत सत्ताधारी भाजपने उरली सुरली शरम सुद्धा चार पैश्यासाठी गहाण टाकलेली दिसत आहे. शहरातील जनतेच्या जीवाशी खेळणे मात्र सत्ताधाऱ्यांना नक्कीच महागात पडेल. शहरातील सत्ताधारी भाजपला जर शहरातील कोरोना बाधित नागरिकांचा जीव वाचवायचा असेल तर मानवतेच्या दृष्टीने संवेदना ठेवून त्यांनी तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनचा महानगरपालिकेकडील साठा कागदपात्रासहित सार्वजनिक करावा. याचबरोबर दिनांक ६ एप्रिल २०२१ पासून आज पर्यंत महानगरपालिकेने किती कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत मिळवून दिले याचा तपशील जाहीर करावा. याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याच्याबाबत झालेल्या घोटाळ्याची महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जावी, अशीहि मागणी या पत्रकार परिषदे करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button