breaking-newsताज्या घडामोडी

नाशिक जिल्ह्याच्या मनमाड नगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव, 4 अधिकारी पॉझिटिव्ह

नाशिक – नाशिक जिल्ह्याच्या मनमाड नगरपालिकेत देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून आज बुधवारी सकाळी पालिकेच्या 4 अधिकाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण पालिका सीलबंद करण्यात आली असून पालिकेचे कामकाज ठप्प झाले.

मनमाड शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, महावितरण कंपनी, उपजिल्हा रुग्णालयापाठोपाठ आता नगर पालिकेतील चार अधिकऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त होताच खळबळ उडाली आहे. यानंतर पालिकेच्या संपूर्ण इमारतीला सॅनिटाईझ करण्यात आले असून संपूर्ण कामकाज बंद करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेला मुख्याधिकारी नव्हते. आज पालिकेत विजय मुंडे यांची नियुक्ती झाली असून हातात सूत्र घेतल्या-घेतल्या त्यांना कोरोनाचा सामना करावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button